कर्करोगावरील उपचारांसाठी तीन हजार कोटींची तरतूद : नड्डा   

छत्रपती संभाजीनगर : कर्करोगावरील उपचाराला सरकारने प्राधान्य दिले असून त्यासाठी ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी सांगितले, 
 
येथील स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ट्रूबीम सुविधेचे उद्घाटन केल्यानंतर नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही कर्करोगावरील उपचारांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तपासणीसाठी आमची आधाररेखा वाढवली आहे. १ लाख ७५ हजार आयुष्मान आरोग्य केंद्रांमध्ये तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली आहे. आम्ही स्क्रिनिंगसाठी वय ३० अनिवार्य केले आहे. कर्करोगाचा उपचार हा प्राधान्यक्रम आहे आणि आम्ही सर्वांसाठी ३० कोटी रुपयांचे धोरण आखले आहे.  
 
तोंडाच्या कर्करोगासाठी २६ कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यानंतर १.६३ लाख रुग्ण आढळले आहेत. स्तनाच्या कर्करोगासाठी तब्बल १४.६ कोटी महिलांंची तपासणी करण्यात आली, त्यामधील ५७ हजार १७९ महिला संसर्गग्रस्त होत्या. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी ९ कोटींहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली आणि ९६ हजार ९७३ महिलांमध्ये दोष आढळून आला. कॅन्सर हा शब्द नागरिकांना घाबरवतो, त्यांना भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या तोडतो. 
 

Related Articles